बाळासाहेबांची शिवसेना (balasahebanchi shivsena) गटातील आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) हे त्यांच्या विधानांवरुन कायमच चर्चेत असतात. शिवसेनेतील (shivsena) बंडानंतर इतर आमदारांसह शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) हे गुवाहाटीला (guwahati) गेले होते. त्यावेळी त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. सत्तातरानंतरही शहाजीबापू कायम चर्चेत होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा आमदार पाटील चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) आमदार एकनाथ खडसे (eknath khadse) यांना शहाजीबापू (Shahajibapu Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला, असे एकनाथ खडसे (eknath khadse) म्हणाले होते. त्यावर शहाजीबापू यांनी भाष्य केले. (balasahebanchi shivsena mla Shahajibapu Patil reply to eknath khadse)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कदाचित त्यांनी ते विधान गंमतीने केलं असेल, किंवा उद्वेगातून केलं असेल. पण बायकोलाही साडी घेऊ शकत नसेल तर तो मर्द कसला, असा टोला खडसे यांनी लगावला होता. पण त्यांनी जे म्हटलं ते कोणत्या हेतूने म्हटलं ते मला माहिती नाही. त्यांची परिस्थिती आमदार झाल्यापासून सुधारली. त्यामुळे आता त्यांना कोणाकडे आशेने बघण्याची आवश्यकता नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले होते. त्यावर आज शहाजीबापू पाटील यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.


"खडसे साहेबांना इतकं का माझ्या मर्दानगीचं वेडं लागलयं? माझी मर्दानगी तपासू नका. त्यांनी त्याचं बघावं," असं प्रत्यूत्तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना दिलं. अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील सांगोल्यामध्ये बोलतं होते.


"हा माझ्या जीवनात घडलेला एक अपघात आहे. पराभवाच्या काळातील मी माझ्या वेदना, दुःख हे माझ्या मित्राला सांगितलं आणि ते व्हायरलं झालं. त्यामुळे थोडसं माझं व्यक्तिगत जीवन समाजापुढे आले. पण तेही चांगलं झालं असं मला वाटतं नाही. परंतु त्या माझ्या वेदना होता. सातत्याने चार पराभव बघितले. गणपतराव देशमुख यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या विरोधात मी लढत होतो. त्यामुळे मला संसाराकडे फारसं बघता आलं नाही. त्यामुळे काही हट्ट झाल्यास ते मी पूर्ण करु शकलो नव्हतो. परंतु नातेवाईकांनी ते संभाळून नेलं," असे शहाजीबापू पाटील म्हणाले.


"पण खडसे साहेबांना माझ्या मर्दानगीचं का वेड लागलं आहे? त्यांनी माझी मर्दानगी तपासू नये. मी कोणत्याही सरकारी संपत्तीवर ढापा मारुन संसार केला नाही. माझे हात पापाने बरबटलेले नाही. ज्यांचे हात पापाने बरबटलेले आहेत, त्यांना देवाने नीट चालयलाही दिलं नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच बघावं, माझ्या बाबतीत बोलू नये," असे शहाजीबापू म्हणाले.


काही दिवसांपूर्वी शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात त्यांनी त्यावेळी बायकोला साडी घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसे नव्हते, असं  सांगितलं होतं. त्यांच्या या विधानावरुन बायकोलाही साडी घेऊ शकत नसेल तर तो मर्द कसला असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला होता.