पुणे : बालभारतीकडून दुसरीच्या गणिताच्या अभ्यासक्रमात अजब बदल करण्यात आला आहे. संख्यावाचन करताना आता एकवीसऐवजी वीस एक, त्र्याहत्तरऐवजी सत्तर तीन आणि त्र्याण्णवऐवजी नव्वद तीन असे शिकवले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुलांना संख्या उच्चरणे सोपे व्हावे म्हणून हा बदल करण्यात सूचविल्याचे  शिक्षणतज्ज्ञ मंगला नारळीकर यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच हा बदल करण्यात आलाय. जोडाक्षर वाचताना विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होते आणि ते अधिक सोपं व्हाव यासाठी हा बदल करण्यात आल्याचं बोललं जातंय. मात्र असा अचानक आणि पहिलीऐवजी असा मधेच दुसरीत बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होणार आहे. मात्र असा बदल करण्याची काहीही गरज नव्हती असं मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केलंय. तर मुलांना संख्या उच्चारणं अधिक सोपं व्हावं त्यासाठी हा बदल सूचवण्यात आल्याचा दावा शिक्षणतज्ज्ञ मंगला नारळीकर यांनी सांगितले आहे. 


दरम्यान, विनोद तावडे यांच्या सततच्या बदलत्या भूमिकेमुळे वादग्रस्त ठरलेले शिक्षण खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतले. ते खाते नव्याने मंत्रिमंडळात सहभागी झालेले मंत्री आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शिक्षणाबाबत झालेला सावळागोंधळ सुधारला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्यांना केवळ तीन महिनेच मिळणार असल्याने ते कसे हे खाते हाताळतात, त्याकडे लक्ष लागले आहे.