Bank Holidays : बँकेच्या कामाचे नियोजन करा अन्यथा..., इतके दिवस बँका राहणार बंद
Bank Holidays News : फेब्रुवारी महिन्यात बँकांना अनेक सुट्ट्या असल्याने संबंधित कामाचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांचे दिवस जाणून घ्या आणि त्यानुसार नियोजन करा.
Bank Holidays News in Marathi : फेब्रुवारी महिना सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. तुम्ही जर या महिन्यात बँकांशी संबंधित महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. कारण फेब्रुवारी महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे या महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासा आणि मग तुमच्या बँकेशी संबंधित कामाचे नियोजन करा. फेब्रुवारी महिना सुरू होण्यापूर्वी बँक किती दिवस बंद राहणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण बँका हा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. तुमच्या खात्यातून पैसे काढण्यापासून ते पैसे जमा करण्यापर्यंत अनेक कामांसाठी तुम्हाला बँकेत जाऊन करावे लागते.
बँकांना किती दिवस सुट्ट्या
फेब्रुवारी महिन्यात एक-दोन नव्हे तर एकूण 14 दिवस बँका बंद असणार आहेत. फेब्रुवारीमध्ये सण आणि साप्ताहिक सुट्ट्या यामुळे नऊ दिवस बँका बंद राहणार आहेत. दरम्यान, यंदा हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतील. काही राज्यांमध्ये, 14 दिवस बँक बंद म्हणजे फक्त 15 दिवस बँका कार्यरत राहतील. त्यामुळे बँकेचे कोणतेही काम करण्यापूर्वी बँकेच्या सुट्टीची यादी एकदा तपासून घ्या...
14 दिवस बँकांना असेल सुट्टी
फेब्रुवारी महिन्यात अनेक सण असल्याने बँकांना सुट्ट्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये विविध राज्यांमध्ये एकूण पाच दिवस बँकांना सुट्टी आहे. महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी येणाऱ्या सुट्ट्यांसह, फेब्रुवारी महिन्यात 14 दिवस सुट्ट्या आहेत. याशिवाय रविवार सुट्ट्या आहेत.
10 फेब्रुवारी 2024: दुसरा शनिवार
11 फेब्रुवारी 2024: रविवार
10 ते 12 फेब्रुवारी 2024: लोसरनिमित्त सिक्किम राज्यात बँकांना सुट्टी
14 फेब्रुवारी 2024: हरियाणा, ओडिशा, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये वसंत पंचमीनिमित्त बँक बंद
15 फेब्रुवारी 2024: लुई-नागाई-नीसाठी मणिपूरमध्ये बँकांना सुट्टी
18 फेब्रुवारी 2024: रविवार
19 फेब्रुवारी 2024: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व बँका बंद.
20 फेब्रुवारी 2024: मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश राज्य दिनानिमित्त या राज्यांमध्ये सुट्टी असेल.
24 फेब्रुवारी 2024: चौथा शनिवार
25 फेब्रुवारी 2024: रविवार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आधारावर बँक सुट्ट्यांची यादी जारी केली जाते. तसेच सुट्ट्यांची यादी ही देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित असते. तसेच फेब्रुवारी हा महिना लीप असल्याने या वर्षात 29 दिवस असणार आहेत.