मुंबई : रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने बुधवारी 'बॅंक ऑफ महाराष्ट्र'वर एक कोटींचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांना दिलेल्या केवायसी आणि फसवणूक वर्गीकरण नियम पूर्तता न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने यासंदर्भात माहीती दिली आहे. बॅंकेने रिझर्व बॅंकेच्या नियमांचे पालन न केल्याने हा दंड ठोठावल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. नियमांचे पालन केल्याने ही कारवाई असल्याने ग्राहक आणि बॅंकेचे व्यवहार, करार, वैधता यावर कोणतीही शंका उपस्थित केली नाही.बॅंक ऑफ महाराष्ट्र वर दंड ठोठावण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आरबीआयने गेल्यावर्षीही बॅंक ऑफ महाराष्ट्रवर एक कोटींचा दंड ठोठावला होता. एका खात्यामध्ये घोटाळा समोर आल्यानंतर बॅंकेकडून हे प्रकरण मिटवायला विलंब करण्यात आल्याने हा दंड ठोठावण्यात आला. 


पोलिसांची कारवाई  


गेल्यावर्षी जून महिन्यात कर्ज गैरव्यवहार प्रकरणात बॅंक ऑफ महाराष्ट्राचे सीईओ रविंद्र मराठे यांना अटक करण्यात आली होती. तीन हजार कोटींच्या डीएसके ग्रुप कर्ज प्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही अटक केली होती. मराठे यांच्या व्यतिरिक्त बॅंकेचे कार्यकारी संचालक आर.के.गुप्ता यांना देखील अटक करण्यात आली होती. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालकराजेंद्र गुप्ता, झोनल मॅनेजर नित्यानंद देशपांडे, डीएसकेंचे सीए सुनील घाटपांडे, इंजिनियरींग विभागाचे राजीव नेवास्कर यांना देखील अटक करण्यात आली.