डीएसके प्रकरणात बँक अधिकाऱ्यांनाही दणका
डीएसकेंना कर्ज देणे आणि कागदावरील कंपन्यांना कोट्यवधींचे कर्ज देण्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे.
पुणे: बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रविंद्र मराठे, कार्यकारी संचालक आर के गुप्ता, विभागीय व्यवस्थापक एन एस घाटपांडे या तिघांना पुणे पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावल्यावर अटक करण्यात आली आहे. डीएसकेंना कर्ज देणे आणि कागदावरील कंपन्यांना कोट्यवधींचे कर्ज देण्याचा आरोप आहे.