पुणे : पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये विविध डेज साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. रोझ डे, चॉकलेट डे असे सर्वच डेज साजरे करण्याला एसपी कॉलेज प्रशासनानं बंदी घातली आहे. कॉलेज आवारात असे कुठलेही डेज साजरे केल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही कॉलेज प्रशासनानं दिला आहे. एसपी कॉलेजमध्ये १६ ते २५ जानेवारी दरम्यान विविध डेज साजरे केले जातात. मात्र आता महाविद्यालयानं घातलेल्या या बंदीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविद्यालयाबाहेरील घटकांकडून महाविद्यालयाच्या आवारात डे साजरे करण्यात प्रयत्न होतो. त्यामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण बिघडू शकतं. महाविद्यालयातील वातावरण आणि सुरक्षितता कायम राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं डॉ. शेठ यांनी म्हटलं आहे.


डेजच्या काळात अनेक विद्यार्थी हे महाविद्यालयात येतात पण वर्गात बसत नाहीत. डेजमुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाला दिवस कमी पडतात. त्यामुळे याआधी देखील काही महाविद्यालयांमध्ये अशाच प्रकारे बंदी घालण्यात आली होती. एसपी कॉलेजकडून मात्र अजून तरी बंदी घालण्यामागचं स्पष्टीकरण समोर आलेलं नाही.