काँलेजमध्ये घुसून विद्यार्थ्याचा खून, बारामती हादरलं!
Baramati Crime: पुण्याच्या बारामतीत असलेल्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय म्हणजेच टीसी कॉलेजमध्ये रक्तरंजित थरार पाहायला मिळाला.
Baramati Crime: राज्यातील खून, बलात्काराच्या घटना कमी होताना दिसत नाहीयत. यामुळे आरोपींना पोलीसांबद्दलचे भय राहिले आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होतोय. बारामतीमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. बारामतीच्या टीसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा खून करण्यात आलाय. कोयत्याने वार करून, चाकू खुपसून विद्यार्थ्याचे आयुष्य संपवण्यात आले. अथर्व पोळ असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होता.
या खूनप्रकरणी ओंकार भोईटे आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पुण्याच्या बारामतीत असलेल्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय म्हणजेच टीसी कॉलेजमध्ये रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. येथे शिकत असलेला विद्यार्थी ओंकार भोईटेचा कोयत्याने सपासप वार करून खून झालाय. यानंतर टीसी कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अथर्ववर कोयत्याने वार करण्यात आले. यानंतर त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. अथर्व पोळ असं खून झालेल्या विद्यार्थ्याचे नांव आहे.तो टी सी ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होता.आरोपी ओंकार भोईटे व त्याच्या साथीदाराने हा खून केला असून आरोपीला घेतले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कॉलेजमध्येच खून झाल्याने बारामती शहरात खळबळ उडाली आहे. हा खून का करण्यात आला? याची माहिती अद्याप समोर आली नाही.
महिला पोलिसावर ब्लेडने हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक कारनामा, मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णावर हल्ला
पोलीस महिलेवर हल्ला केल्याची घटना 3 दिवसांपूर्वी घडली होती. बाबासाहेब सोनवणे असे या आरोपीचे नाव असून हल्ला करणाऱ्या बाबासाहेबला मध्यवर्ती रुग्णलयात उपचार सुरु होते. येथे उपचार घेत असताना आरोपीने एका रुग्णावर हल्ला केलाय. या घटनेत रुग्ण गंभीर जखमी झाला आहे. आरोपी बाबासाहेब सोनवणे विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी बाबासाहेब सोनवणे याने आधी महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला होता. नंतर हा आरोपी मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेत होता. पण येथेही त्याच्या वर्तनात काही बदल झालेला दिसला नाही. आरोपीच्या बाजूच्या बेडवर सलमान सय्यद या तरुणावरदेखील उपचार सुरू होते. दरम्यान आरोपी बाबासाहेब सोनवणे याने चक्क स्टील खुर्ची थेट सलमान सय्यद याच्या डोक्यात, तोंडावर मारून फेकली. या घटनेत सलमान सय्यद गंभीर जखमी झालंय. आरोपी हा वेड्यासारखे वागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आता याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.