बारामतीत पवारांना ४४० व्होल्टचा झटका, माळेगाववर भाजपचा झेंडा....
बारामती तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असल्याचं मानलं जात आहे.
बारामती : बारामती तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असल्याचं मानलं जात आहे.
तालुक्यातील माळेगाव ही ग्रामपंचायत सर्वात मोठी असून या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांचे पुतणे जयदीप तावरे यांची सरपंचपदी निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीत गेल्या ३ वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता होती.
काही दिवसांपूर्वी काटेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीला यश आलं असलं तरी माळेगाव ग्रामपंचायतीवर सत्ता कायम ठेवण्यास राष्ट्रवादीला अपयश आलं आहे.
बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पवारांच्या बालेकिल्ल्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये अपयश आलं असल्यामुळे हा अजित पवारांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.