खराब पाण्यापासून बर्फ निर्मिती, सावधानतेचा इशारा
खराब पाण्यापासून बर्फ निर्मितीची शक्त्यातही वाढल्याने अन्न व औषध प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिलाय.
धुळे : उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बर्फाची मागणी वाढलीय. त्यामुळे खराब पाण्यापासून बर्फ निर्मितीची शक्त्यातही वाढल्याने अन्न व औषध प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिलाय. बर्फ विकत घेताना आणि त्याचा वापर करताना संबधित बर्फ चांगल्या पाण्यापासून तयार करण्यात आला आहे कि नाही त्याची शहनिशा ग्राहकांनी करणे गरजेचे झाले आहे. धुळे शहरातील चार बर्फाच्या कारखानावर देखील बर्फाची मागणी प्रचंड वाढली आहे.
थंड पदार्थांची मागणी वाढली
उन्हाचे चटके जाणवू लागल्याने थंड पदार्थांची मागणी वाढावी आहे आणि त्या पदार्थांमध्ये टाकण्यासाठी बर्फाची मागणी वाढली आहे. यंदा तापमान वाढ सर्वसामान्यांना नकोशी झाली असली तरी बर्फ निर्मात्यांच्या पथ्यावर पडणारा हा उन्हाळा ठरतोय.