विशाल करोळे, औरंगाबाद : कोरोनाचं लसीकरण अजून सामान्यांसाठी नाही. याचाच फायदा घेऊन ठकसेनांनी फेक कॉल आणि फेक मॅसेजचं जाळं विणायला सुरुवात केली आहे. कोरोना लसीच्या आमिषानं फसवणुकीची शक्यता वाढली आहे. फेक कॉल आणि फेक मॅसेजसपासून यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी सामान्य नागरिकांना अजूनही कोरोना लस मिळालेली नाही. जिवघेण्या कोरोनापासून वाचण्यासाठी प्रत्येकालाच कोरोना लस हवी आहे. याचाच फायदा घेऊन लुटारुंनी फसवणुकीचा नवा धंदा सुरु केला आहे. सोशल मीडियावर लस विक्रीचे मॅसेज फिरवण्यात येऊ शकतात.  कोरोना लस ऑनलाईन विक्रीचे फोनही येऊ शकतात. काही बोगस वेबसाईटच्या लिंकही मोबाईलवर पाठवल्या जाऊ शकतात. काहींना कोरोना लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनसाठी ई-मेलही पाठवले जाण्याची शक्यता आहे. 


लसीचं आमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याची चर्चा खासगीत सुरु आहे. लसीच्या आमिषानं तुमची आमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनो लसीच्या बोगस कॉल आणि बोगस मॅसेजपासून सावधान...