VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये चढणं कुटुंबाला पडलं महागात... थोडक्यात बचावले नाहीतर पाहा काय झालं असतं!
Nashik Road News: नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी धावत्या पंचवटी एक्सप्रेस मध्ये दोन लहान मुलांसह आईवडिलांनी चढण्याचा प्रयत्न केला मात्र संपुर्ण कुटुंबीयचं प्लॅटफॉर्मवर कोसळले.
Railway Accidents: हल्लीचे जीवन हे अत्यंत धकाधकाचे झाले आहे त्यामुळे आपल्याला सगळ्याचं गोष्टी करण्याची घाई असते. मग रेल्वेमध्ये (Railway News) चढणंही त्याला अपवाद नाही. धावत्या ट्रेनमधून घाई करत चढण्याची घाई तुमच्या जीवावर बेतू शकते. परंतु असं असूनही अनेक लोकं मात्र पुन्हा पुन्ही तीच चूक करताना दिसतात आणि सरतेशेवटी त्यांनाही ते महागात पडते. अनेकांचा यामुळे जीवही गेला आहे परंतु लोकं याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. अशा घटनांच्या अनेक बातम्या या समोर येताना दिसतात. त्यामुळे सध्या अशा काही घटनांमुळे पुन्हा एकदा सुरक्षिततेचा (Railwaysafety) प्रश्न समोर आला आहे. सध्या अशीच एक घटना पुन्हा एकदा नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा धावत्या ट्रेनमध्ये चढणं आणि त्यातून होणारे अपघात हा पुन्हा एकदा एक चर्चेचा विषय ठरला आहे. (Be careful if you board a moving train a family narrowly escaped in Nashik CCTV footage goes viral)
नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर बुधवारी सकाळी धावत्या पंचवटी एक्सप्रेस मध्ये दोन लहान मुलांसह आईवडिलांनी चढण्याचा प्रयत्न केला मात्र संपुर्ण कुटुंबीयचं प्लॅटफॉर्मवर कोसळले. रेल्वे फलाटावरील नागरिकांनी आणि आरपीएफ जवानांनी त्यांना शिताफीने वाचवले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. अवघ्या काही सेकंदातील हा सर्व जीवघेणा थरार सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाला आहे. ही दृश्यं पाहून तुम्ही निदान अशाप्रकारे चढण्याचा प्रयत्न करणार नाही. असा प्रकारे ट्रेनमध्ये चढणं हे आपल्या सर्वांच्याच दृष्टीनं धोकादायक ठरले आहे.
यापुर्वीही असे अनेक प्रकार घडले आहेत ज्यात अनेकांचा जीव धोक्यात आला होता. खूप जणांना आपले जीवही गमावावे लागले आहेत. कधी आई-मुलीचा मृत्यू तर कधी कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरूणाचा मृत्यू अशाही अनेक बातम्या समोर येताना दिसतात. आत्तापर्यंत 2 हजाराहून अधिक लोकांना ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात अनेकांचा मृत्यू हा रेल्वे ट्रॅक ओलांडताना झाला आहे. त्यातून अधिकांचा मृत्यू हा धावत्या रेल्वेमधून पडून झाला आहे. लहान मुलांचे आणि म्हाताऱ्या लोकांचेही मृत्यू (Death in Railway accidents) यातून होताना दिसत आहेत.
अनेकांचे मृत्यू हे रेल्वे रूळ ओलांडताना किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना खांबाला आदळल्यानं झाले असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशाशन आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून अनेक उपाययोजना करणेही बंधनकारक आहे. तश्या उपाय योजनाही केल्या जात आहेत. अनेकदा या सगळ्यात वाढत्या अपघातांमध्ये रेल्वे प्रवाशांचा निष्काजीपणा असल्याचे समोर आले आहे. अनेकदा प्रवासी हे रेल्वेनं केलेल्या घोषणांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. यामध्ये अनेकदा रेल्वे प्रवाशांची गर्दी होताना दिसते त्यामुळेही अनेक जणांना अपघातालाही सामोरे जावे लागते.