COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा : सकाळी प्रातर्विधीसाठी जाताय.सावधान..अगदी तुमच्याच बाथरुममध्ये जात असाल, तरीही जरा जपूनच.... तुमच्या टॉयलेटची सीट एकदा तपासून पाहा..अगदी कमोडवरचं झाकणही नीट उचलून पाहा.तुम्ही प्रातर्विधीसाठी टॉयलेटमध्ये जाता..... तिथं जाताना टॉयलेट साफ आहे का, हे पाहता ना...? पण आता टॉयलेटमध्ये साप आहे का, हे देखील पाहावं लागणाराय... पाहा भंडाऱ्यात काय घडलं?


कमोडमध्ये नाग 


भंडाऱ्यात एक धक्कादायक घटना घडलीय. भंडारा शहराच्या अंबिका नगरमध्ये राहणारे गुरुदेव सार्वे पहाटे पाच वाजता प्रातर्विधीसाठी बाथरुममध्ये गेले आणि त्यांना धक्काच बसला. त्यांच्या कमोडमध्ये चक्क नाग लपून बसला होता.  साधासुधा नव्हे विषारी कोब्रा.... मग गुरुदेव यांनी कमोडचं झाकण बंद केलं. आणि सर्पमित्राला फोन केला. 


मृत्यू होण्याची शक्यता 


सर्पमित्र तातडीनं सार्वेंच्या घरी पोहोचले. कमोडमधून या नागाला काढायला तब्बल एक तास लागला.... स्पेक्टॅकल्ड कोब्रा जातीचा हा नाग होता. त्यानं दंश केल्यावर माणसाच्या मज्जातंतूवर आघात होऊन ताबड़तोब पक्षाघाताचा झटका येवून थेट मृत्यूच होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात सरपटणारे प्राणी सुरक्षित आसरा शोधत घरात पोहोचतात... त्यामुळे पावसाळ्यात सगळ्यांनीच जरा काळजी घ्या. झोपेत बाथरुममध्ये जाऊ नका.