वाल्मिक जोशी, झी मीडिया जळगाव: कोरोनामुळे अनेकजण आता ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन शॉपिंग साईटकडे वळले आहेत. अगदी मास्कपासून ते घरातील सामानापर्यंत अनेक वस्तू या ऑनलाइन मागवल्या जातात. ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याचं प्रमाण वाढल्यानं फसवणूक आणि सायबर क्राईमच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. महाराष्ट्रातही अशी एक धक्कादायक घटना समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकानं ऑनलाइन साडी मागवली. मात्र ही साडी चांगली न निघाल्याने परत करण्याच्या नादात त्याची हजारो रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार जळगावात घडल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑनलाईन मागविलेली साडी खराब निघाल्याने ती, परत करण्याच्या नादात जळगाव शहरतील गणेश कॉलनीतील सेवानिवृत्त वृध्दाची 74 हजार 999 रुपयात फसवणूक झाल्याची घटना घडली. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गणेश कॉलनी येथे कुलकर्णी कुटुंबासह राहातात. कुलकर्णी यांनी 31 ऑगस्ट रोजी आयबीआयएसबी या कंपनीतून ऑनलाईन पद्धतीने साडी मागविली होती. साडी मिळाली मात्र, ती खराब निघाल्याने कुणकर्णी यांनी गुगलवरुन कंपनीचा 8969923270 हा क्रमांक मिळवला. त्यावर संपर्क साधला असता, संबधितांनी एनी डेक्स ऍप डाऊनलोड करायला सांगितले. 


यादरम्यान कुलकर्णी यांना त्यांचा मोबाईल नंबरही दिला. ऍप डाऊनलोड करताच कुलकर्णी यांच्या बॅकखात्यातून पहिल्या वेळी 25 हजार दुसर्‍या वेळी 49 हजार 999 असे एकूण 74 हजार 999 रुपये कपात झाल्याचे कुलकर्णी यांना मेसेज आले. 8969923270 या क्रमांकावरील व्यक्तीने आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर कुळकर्णी यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी 420 व फसवणुकीचा  गुन्हा दाखल झाला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.