New Year Celebration Party : कोरोनामुळे (Corona) गेली दोन वर्ष 31 पार्टीवर निर्बंध होती. पण यावर्षी कोणतेही नियम ठेवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे यावर्षी मोठ-मोठ्या हॉटेलपासून ढाब्यापर्यंत सगळीकडे लगबग सुरु आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनव्या ऑफर दिल्या जात आहेत. मद्यप्रेमींसाठी (Alcoholic) तर हा खास क्षण असतो. पण थर्टी फर्स्टला (31st Party) जर तुम्ही झिंग झिंग झिंगाट होणार असाल तर ते तुमच्या जिवावर बेतू शकतं. या एकाच मद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. हीच संधी साधत बनवाट दारू विक्रीचा धंदाही तेजीत येतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात बनावट दारुची सर्रास विक्री
थर्टी फर्स्ट लक्षात घेऊन राज्यात बनावट दारूची (Fake Liquor) सर्रास विक्री सुरू आहे. संभाजीनगर, रत्नागिरी आणि पुण्यात बनावट आणि अवैध दारुचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. संभाजीनगरमध्ये (Sambhaji Nagar) राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत बनावट दारूसाठा जप्त केलाय. तब्बल 13 लाख रुपयांची बनावट दारू हस्तगत करण्यात आलीय. 720 देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्यात. 


संभाजीनगरमध्ये बनावट दारु विक्रेत्यांना अटक
राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने (State Excise Duty) शहरातील पिसादेवी शिवारात सापळा रचून ड्रायडेच्या दिवशी देशी दारू विक्री करणाऱ्याचा पाठलाग केला. यामध्ये पथकाला 720 देशी दारूच्या बाटल्यासह 1 लाख 30 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. मात्र आरोपी फरार होता आरोपीचा शोध घेत असताना पथकाने आरोपीचं घर गाठले त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने आरोपीच्या घरातून देशी दारुसह जवळपास 13 लाख 24 हजार 770 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या गुन्ह्यांमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.


पुण्यात धडक कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातही (Pune) मोठी कारवाई केलीय. तब्बल 2 ट्रक अवैध मद्यासाठा जप्त केलाय. जप्त मालाची किंमत सुमारे 1 कोटी 70 लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे.


हे ही वाचा : Corona in India : भारतात पुन्हा कोरोनाची लाट? नागरिकांनो काळजी घ्या, पुढील चाळीस दिवस महत्त्वाचे


रत्नागिरीत गावठी दारू साठा जप्त
तर दुसरीकडे रत्नागिरीच्या (Ratnagiri) लांजा तालुक्यातही 53 हजारांची गावठी आणि देशी-विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात आलाय. याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं तब्बल 2 ट्रक अवैध मद्यसाठा जप्त केलाय. जप्त मालाची किंमत तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलीय. 


यंदाच्या वर्षी 31 डिसेंबरला आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मोठा जल्लोष होणार आहे. त्याचं कारण म्हणजे अवघ्या तीन दिवसांत 7 लाख मद्यपींनी ऑनलाईन दारूचे परवाने काढलेत. 31 तारखेपर्यंत हा आकडा आणखी 5 लाखांनी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे बनावट दारुचाही सुळसुळाट झालाय. त्यामुळे तुम्ही जर थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करण्याची तयारी करत असाल तर सावधान.