मुंबई : वाघ म्हणजे जंगलाचा अनभिषिक्त राजा...पण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी कधी या राजाला देखील वेळप्रसंगी माघार घ्यावी लागते.  याचाच नमुना चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्यातील जामुनबोडी भागात पाहायला मिळाला. काही पर्यटक जंगल सफारीवर असताना त्यांना वाघ आणि अस्वल यांच्यातला संघर्ष पाहायला मिळाला. 


पाहा वाघ आणि अस्वलाचा संघर्ष 


जामूनबोडी इथं वाघ आणि अस्वल एकाचवेळी पाणी पिण्यासाठी आले. मग काय, शेरखान आणि बल्लू, हे एकमेकांचे परंपरागत शत्रू थेट एकमेकांवर चाल करून गेले. वाघानं बराच वेळ अस्वलाला आपल्या जबड्यात जखडून ठेवलं होतं. पण शेवटी अस्वल शिरजोर झालं. अगदी वाघाला पाण्यात ढकलण्यापर्यंत अस्वलानं मजल मारली. वाघाला पाण्यात ढकलून अस्वलानं जणू होळीच साजरी केली. बराच वेळ वाघ आणि अस्वलाची ही कुस्ती रंगली होती.


या वाघाचं वय जेमतेम 2 ते 3 वर्षाचं असावं. त्यामुळंच अस्वलापुढं त्याला माघार घ्यावी लागली असावी, असा अंदाज आहे. तज्ज्ञांच्या मते या व्हिडिओत दिसणारा वाघ ताडोबातील मजुरांचं टोपले पळवणारा 'मटकासुर' असावा, अशी शक्यता आहे. एका वन्यजीवप्रेमीनं काढलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय...