बीड : Beed Robbery : कोरोना टेस्टसाठी (Coronavirus test) आल्याचं सांगून बीडमध्ये वृद्ध दाम्पत्याच्या घरात दरोडा टाकण्यात आला आहे. माजलगावातल्या शिक्षक कॉलनीत मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला. (Robbery at the home of an elderly couple in Beed)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी कुटुंबातील लक्ष्मणराव आणि सावित्री शिंदे हे वृद्ध दाम्पत्य मुलांसह राहते. रात्री मुलं वरच्या मजल्यावर झोपलेली असताना 6 दरोडेखोर आले. त्याची कुणकुण लागल्यावर खालच्या खोलीत झोपलेल्या वृद्धांनी आरडाओरडा केला. पण आम्ही कोरोना टेस्ट करायला आलोय असं म्हणत दरोडेखोरांनी दोघांना मारहाण केली आणि 2 लाख 47 हजारांचे दागिने आणि पैसे घेऊन घराला बाहेरुन कढी लावून पळ काढला. सध्या पोलीस या 6 दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.


'चूप बैठ, हम कोरोना टेस्ट कर रहे है'


वृद्ध दाम्पत्यास शस्त्राचा धाक दाखवून काठीने मारहाण केली आणि सहा अज्ञात दरोडेखोरांनी रात्री दोनच्या सुमारास घरातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेची लूट करून पोबारा केला. शेतकरी कुटुंबातील लक्ष्मणराव शिंदे आणि सावित्री लक्ष्मण शिंदे हे वृंद दाम्पत्य आपल्या तीन विवाहित मुला सुना नातवंडसह घरी होते. बुधवार  रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान मोठा मुलगा राजेश शिंदे घरी उशिरा आला आणि घराच्या मेन गेटला आतून कुलूप लाऊन आपल्या पत्नीला घेऊन वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. दरम्यान खालच्या हॉलमध्ये वृद्ध असणारे संजीवनीबाई आणि लक्ष्मणराव झोपून गेले. 


पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घराच्या मेन गेटचे कुलूप तोडत असल्याचा आवाज शिंदे वृद्ध दांपत्याला झाला. दरम्यान सहा अज्ञात दरोडेखोरांनी दरवाजा तोडत प्रवेश केला. शिंदे दाम्पत्याने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करतातच शस्त्राचा धाक दाखवून त्यांना हातातील काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. चुप बैठो हम यहा कोरोना टेस्ट कर रहे है, असे दरडावून घरातील सामानाची नासधूस केली. दागिणे आणि रोख रखम लूटली.