COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड : एका पेशानं डॉक्टर असलेल्या व्यक्तीने बायकोला जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडलीय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून यामागचं कारणंही तितकंच धक्कादायक आहे. 


या डॉक्टर दाम्पत्याला पहिले अपत्य मुलगी होते. त्यानंतर दुसरी मुलगी झाल्याने डॉक्टरनं बायकोला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. 



या महिलेवर  बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उस्मानाबादमधल्या कळंबमध्ये गुन्हा दाखल झालाय. या घटनेनंतर डॉक्टरविरोधात संताप व्यक्त होत आहे. विज्ञान, शरीर शास्त्राची माहिती असताना देखील डॉक्टरकडून असं कृत्य कसं होऊ शकतं असा प्रश्न नागरिकांना पडलाय.