विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : राज्यात काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आहेत. बीडच्या चुंबळी गावातील एक 24 वर्षीय डॉक्टर तरुणीदेखील सरपंचपदी विराजमान झाली आहे. कमी वयात इतकी मोठी जवाबदारी  स्विकारल्यामुळे तिचं कौतुक होतं आहे. दुसरीकडे या तरुणीने सरपंच झाल्यानंतर तिने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे ती चर्चेत आली आहे. सरपंचपदी असे पर्यंत या तरुणीने गावातील लोकांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. या तरुणीच्या निर्णयाने डॉक्टरी पेशाला फक्त पैशाचं साधन मानणाऱ्या डॉक्टरांच्या डोळ्यात अंजन घालणारी तसेच त्यांना देखील सामान्य लोकांसाठी काहीतरी करता येऊ शकतं ही दाखवणारी प्रेरणादायी कहाणी समोर आली  आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुंबळी गावच्या सरपंच डॉक्टर रेश्मा पवळ यांनी गावामध्ये पुढील सहा वर्ष मोफत आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तपासणीस उपचार आणि जयंती उत्सवांना वेगवेगळी आरोग्य शिबीर देखील राबवली जाणार आहेत. त्यामुळे डॉक्टर झालेला या लेकीने सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर आपण घेतलेल्या विद्येचा सर्वांसाठीच वापर होऊ शकतो यातून दाखवलेला हा भाव सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे


बीड जिल्ह्यातील 3500 वस्तीच लोकसंख्या असलेलं चुंबळी गाव चुंबळी गावात यंदा सरपंच पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये रेश्मा पवळ या 24 वर्षीय तरुणीने सरपंच पदासाठी आपलं नशीब आजमावलं. सुरुवाती पासूनच निवडणुकीत उतरल्यावर रेश्माने जिंकण्यासाठीच प्रयत्न केले आणि त्यांना अखेर यश मिळाले. गावातील लोकांनी रेश्माला रेकॉर्डब्रेक मतदान करत सरपंच बनवलं. 24 व्या वर्षी सरपंचपद मिळाल्यानंतर रेश्माने आता गावातच राहण्याचा निर्णय घेतला. सहा वर्ष आपण गावातच राहणार असल्याचं तिने जाहीर केलय. गावातील सर्व लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी रेश्माने आपली स्वप्ने बाजूला करत मोफत सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयाच आता सर्वत्र कौतुक होतय.


अशी सामाजिक जाणीव ठेवल्यास अनेकांना याचा लाभच होईल


खरतर युवा पिढीकडे आज पैसा कमवण्याचे सल्ले अनेकजण देत असतात, तर डॉक्टर म्हटलं की पैसा कमवा भरपूर पैसा कमवलेले लोक देखील पाहायला मिळतील. मात्र सामाजिक भान आणि सामाजिक जाणीव लक्षात घेता या तरुणीने घेतलेला निर्णय विकास होत आहे सरपंच पदी विराजमान झाल्यानंतर आपण घेतलेल्या पदवीचा ही फायदा व्हावा यासाठी तिने आता आरोग्य सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतलाय आणि न येणारे नवतरुण डॉक्टरांसाठी तसेच त्या डॉक्टरांनी माया कमवली त्यांना देखील सामाजिक भान दाखवणार हा निर्णय आहे... एखादी पदवी मिळूनच उपयोगाची नाही तर तिचा वापर योग्य पद्धतीने कसा करावा लागतो हे या तरुणींना दाखवून दिले.. त्यामुळे तरुणांनी घेतला निर्णय सर्वांसाठीच प्रेरणादायी असेल.