Manoj Jarange Patil On Maratha Reservation : विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन OBC मधून आरक्षण दिले नाही तर उद्यापासून पाणी सोडणार असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी दिला आहे.  मराठा आंदोलकांना आंदोलन करु द्या. गुन्हा दाखल केला तर मी येथून उठून बीडमध्ये कलेक्टर यांच्या समोर जाऊन बसेन मग तिकडे 10 लाख कार्यकर्ते येतील की किती येतील ते मला माहित नाही असा धमकीवजा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ यांना दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड मधील संचारबंदीला मनोज जरांगे यांनी विरोध केला आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहोत. आमची आंदोलन मोडीत काढू नका. बीडमध्ये जातीयवादी अधिकारी आहेत. अधिकारी जातीयवादी नसले पाहिजेत. 144 बंदी हटवा. आंदोलन थांबू नका. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. आंदोलकांना त्रास झाला तर आम्ही देखील त्रास देऊ मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा.  


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी नवा इशारा दिलाय. विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्या.. आज रात्री किंवा उद्या मराठा आरक्षणासाठी ठोस निर्णय घेतला नाही तर उद्यापासून पूर्ण पाणी बंद करणार असा इशारा जरांगे-पाटलांनी दिलाय. मराठ्यांना कुणबीतून आरक्षण दिल्यामुळे ओबीसी आंदोलन करणार असतील तर बघू. असा आक्रमक पवित्राही जरांगेंनी घेतलाय. त्यामुळे सरकारसमोर आता नवं आव्हान उभं ठाकलं आहे. जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करत होते. मात्र विशेष अधिवेशनानं हा प्रश्न सुटू शकत नसल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिलीय. 


धाराशिवमध्ये 150हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल


मराठा आंदोलनाच्या नावानं राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारामागे काही राजकीय नेते असल्याचं वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय.. सीसीटीव्ही तपासून हिंसाचार करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा फडणवीसांनी दिलाय.  धाराशिवमध्ये दीडशेहून अधिक मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सोलापूर-धुळे महामार्गावर दोन ठिकाणी मराठा बांधवांनी आंदोलन केलं होतं. टायर जाळून राज्य महामार्ग रोखण्यात आला होता. याप्रकरणी वाशी पोलिसांनी कारवाई केलीय. कलम 341, 188, 283,  285 सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेत.