विष्णु बुरगे, बीड : राज्यात कोरोनाचे संकट आहे. अनेक जण लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. त्यांना शासनाच्यावतीने मदत आणि अन्न धान्य देण्यात येत आहे. मात्र, असे असताना काही जणांना अन्नधान्य पोहोचत नसल्याची बाब पुढे आली. बीडच्या गेवराई तालुक्यातील आहेर वाहेगाव इथं पारधी समाजाचे लोक राहातात. मात्र लॉकडाऊन काळात रेशन मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर बीट खावून जगण्याची वेळ आली होती. त्यानंतर १नं ही बातमी दाखवताच बातमीची दखल घेत प्रशासनाकडून त्यांच्या अन्नाची व्यवस्था करण्यात आली.  'झी २४ तास'च्या वृत्तानंतर प्रशासन पारधींच्या मदतीला धावलं पण नेमकी काय समस्या होती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 घरात अन्नधान्य नसल्याने बीट शिजवून खाण्याची वेळ कुटुंबावर आली. समाजानं गावगाड्याबाहेर ठेवलेल्या पारधी समाज बांधवांची अवस्था खूपच बिकट झाली होती. बीड जिल्ह्यातल्या आहेरवाहेगावच्या पारधी वस्तीप्रमाणे राज्यातल्या गावकुसाबाहेरच्या पारध्यांच्या शेकडो तांड्यांवर थोड्याफार फरकाने हीच अवस्था आहे. सरकारने रेशनिंगवर धान्य जाहीर केले. पण रेशनिंग कार्ड असूनही ते मिळालेले नव्हते. त्यामुळं बीट शिजवून खायची वेळ पारध्यांच्या मुलाबाळांवर आली होती.


गावात वाणसामान आणायला जायचं तर गावातली लोकं कोरोनामुळं गावात घेत नाहीत. हाताला काम नाही. त्यामुळं जगायचं कसं असा प्रश्न पारधी समाज बांधवांना पडला होता. पुरवठा अधिकारी मात्र अशा तक्रारीच आल्या नाहीत सांगत सगळं काही सुरळीत असल्याचा दावा करत होते. पारधीही माणूसच आहे. पण त्यांना रेशनिंग नाकारणं, त्यांना गावबंदी करणं हे कोणत्या कायद्यात बसतं, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. या वाचा 'झी २४ तास'ने फोडली आणि या कुटुंबाला रेशन मिळाले. आता हे कुटुंब आनंदी आहे. त्यांनी 'झी २४ तास'चे खास आभार मानले आहेत.