धारूर : आज दुपारी धारूर तालुक्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. भर उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यात लेंढी नदीला पूर आला. ज्यामुळे अनेक झाडं मोडली गेली, तर काही जणांच्या घरावरील पत्रे उडुन गेले ज्यामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले, अशात आज दुपारी जोरदार पाऊस झाल्याने हजेरी लावली, ज्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले, तर काही शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. कारण ज्यांचे पीक काढणीला आले होते त्यांचे नुकसान झाले आहे. तर ज्या शेतकऱ्यांना शेतीला सुरवात करायचा होती त्यांना या पावसामुळे लवकर शेती करता येणे शक्य होणार आहे. यामुळे काही शेतकरी वर्ग खुश झाला आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गात 'कही खुशी कही गम' अशी अवस्था झाली आहे. यापावसामुळे अंब्याचे तसेच भाजीपाल्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .


गेल्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागांत पाऊस पडला आहे. पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक ठिकाणी शेती आणि फळपिकांचं नुकसान झालं आहे.


हवामान खात्याने पुढील 24 तासांमध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. 


गोंदियाचे ही नुकसान


गोंदिया जिल्हातील तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आमगाव तालुक्यात अनेक शेतकर्‍यांचे रब्बी पिक कापणीसाठी तयार झाले होते. परंतु पूर्व मोसमी पाऊस आणि गारपिटीने धान पिकाचे नुकसानं झाले आहे. यासगळ्या परिस्थितीची माहिती मिळताच तात्काळ तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांनी या गोष्टीकडे गंभीरतेने लक्ष देऊन तलाठी नारायण तोरणकर आणि कृषी सहाय्यक प्रियांका बावनकर यांना पंचनामा करण्यासाठी आदेश दिले आहे.