Beed Zilla Parishad School: गावखेड्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी मैलोन मैल अंतर पार करुन जातात. जवळपास शाळा नसल्याने त्यांना दूरवरचा प्रवास करावा लागतो. शिक्षणासाठी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सफाई कर्मचाऱ्यांची काम करुन घेतली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पालक वर्गातून संताप व्यक्त होतोय. काय हा प्रकार,कुठे घडलाय? सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या मुलांने भविष्यात चांगल करिअर करावे यासाठी चांगले शिक्षण घ्यावे म्हणून पालक मुलांना घरी जास्त कामे सांगत नाही. शौचालय स्वच्छतेची कामे तर मुलांना अजिबात सांगितली जात नाहीत. चांगले शिक्षण घेऊन मुलांनी प्रगती करावी म्हणून पालक शाळेत पाठवतात पण बीडच्या शाळेतील प्रकार पाहून पालकांच्या मनात शाळेविषयी चीड निर्माण झालीय. 


चिमुकल्यांकडून शौचालय साफ


जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्यांकडून शौचालय साफ करून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बीड तालुक्यातील मुळुकवाडी केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतील यां प्रकारामुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.


पाहा व्हिडीओ 




पालकाने काढला व्हिडीओ 


बीडच्या मुळकवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना टॉयलेट आणि बाथरूम साफ करायला लावले. यावेळी एका पालकांने हा व्हिडिओ काढला. यानंतर पालकांनी शालेय शिक्षकांना यासंदर्भात जाब विचारला. विद्यार्थ्याकडून अशी कामे करून घेतल्याने विद्यार्थी आजारी पडण्यास जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.


सरकारने लक्ष देणे गरजेचे 


जिल्हा परिषद शाळांमध्ये सफाई कर्मचारी भरती असणे आवश्यक आहे. ही पदे रिक्त असल्याने शिक्षक विद्यार्थ्यांकडून अशी काम करुन घेण्याचे प्रकार वारंवार समोर येतात. त्यामुळे या गोष्टीकडे सरकारनेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे.


शिक्षण विभागाने घेतली दखल


मुळूकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमधील शौचालय मुलांकडून साफ करून घेतल्याची बातमी झी 24 तास न दाखवल्यानंतर बीड शिक्षण विभाग खडबडून जागा झालाय. शिक्षण विभागाकडून विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख हे दोघांची समितीत करून एक पथक चौकशी करण्यासाठी मुळकवाडी येथील शाळेवरती पोहोचला आहे. लहान मुलांना भूकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शौचालय साफ करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्या होत्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता त्यानंतर आता शिक्षण विभागाने झी 24 तास च्या बातमीची दखल घेतली चौकशी समिती पाठवली आहे.