अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात एका नवरदेव,व-हांडाना कोरोना नियमांचा झालेला विसर चांगलाच महागात पडला आहे. मास्क न घालता अतिउत्साहात  निघालेल्या व-हाडी आणि घोड्यावर विनामास्क असलेला नवरदेव यांना महापालिकेच्या उपद्रव शोध पथकानं दंड ठोठावला...नवरदेव आणि या व-हाड्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे...महत्वाचं म्हणजे तिस-या लाटेची भीती आणि त्यात  डेल्टा प्लसचं संकट या पार्श्वभूमिवर कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालक करणं आवश्यक असताना लग्न सोहळ्यातील असा निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात कोरोना नियंत्रणात आला आहे....मात्र दुस-या लाटेत मार्च, एप्रिल आणि मे दरम्यान कोरोनानं केलेला कहर फार विघातक ठरला..जुनमध्ये कोरोनाचा रुग्णांची संख्या कमी झाली...मात्र आता संभाव्य  तिस-या लाटेकरता आत्तापासूनचं प्रत्येकानं सजग राहणं आवश्यक आहे..मात्र अजूनही अनेकजण कोरोनाबाबतचे नियम पाळताना दिसत नाही.


नागपुरात काल एका विनमास्क घोड्यावर जाणा-या  नवरा आणि व-हाडींवर कारवाई करण्यात आली.शहरातील नेहरूनगर झोनमध्ये ही कारवाई करण्यात आली. वाजगाजत  ही वरात निघाली होती.व-हाडी बँडच्या तालावर नाचत होते...तर नवरदेवही अश्वावर गॉगल... बाशिंगासह मोठ्या दिमाखात जात होता...मात्र या वरातीतील नवरदेव आणि अनेक व-हाडी विनामास्क होते.


महापालिकेच्या उपद्रवशोद पथकाला कारवाई सुरु असताना ही कोरोना नियमांच उल्लंघन करणारी वरात दिसली. त्यांनी थेट नवरदेवालाच थांबवले...त्यानंतर नवरदेव आणि चार व-हांडीवर कारवाई केली....खऱतर कोरोना कमी झाला असला तरी संपलेला नाही मात्र मास्क न घालणं म्हणजे रुबाबाचं काम असं भ्रम अजून अनेक जण बाळगतात....मास्क वापरणं, सुरक्षित अंतर ठेवणे हे अत्यावश्क असताना उत्साहात अनेकांना त्याचा विसर झालेला पुन्हा दिसू लागलाय. त्यामुळं या वरातीवर महापालिकेच्या पथकानं चांगला दणका दिला आहे. 


आतातपर्यंत पावणेदोन कोटींपेक्षा जास्त दंड  


मास्क न घालणे, कोरोनाच्या नियमाचं उल्लंघन करणा-यांकडून दंड वसूल करण्यात येतो. मागील काही महिन्यात उपद्रव शोध पथकानं तब्बल 38 हजार 593 जणांवर कारवाई करून आतापर्यंत 1 कोटी. 76 लाख, 55 हजार पाचशे(1,76,55,500)  एवढा दंड वसूल केला आहे.