प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : काँग्रसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काही महिन्यांपूर्वी उल्लेख केलेला 'तो' गावगुंड मोदी आता पुन्हा चर्चेत आला आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जेवणाळा इथं एका कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी 'आपण मोदीला मारू शकतो आणि शिवा देऊ शकतो असा उच्चार केला होता' हा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला.  नाना पटोले यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना उद्देशून वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. याचे तीव्र पडसाद उमटले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर नाना पटोले यांनी आपण लोकांना त्रास देणाऱ्या गावगुंड उमेश घरडे ज्याला मोदी म्हणतात त्याबाबत असा उच्चार काढल्याचा खुलासा करत प्रकरणावर पडदा घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अचानक गावगुंड मोदी जिल्ह्याबाहेर गायब झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं. आता तो गावगुंड मोदी अर्थात उमेश घरडे पुन्हा एकदा अवतरला आहे. आणि तेही चक्क काँग्रेसच्याच कार्यक्रमात.


भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूरमध्ये (lakhandur) काँग्रेसतर्फे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात नाना पटोले आणि उमेश घरडे एकाच व्यासपीठावर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 


लाखांदुरात काँग्रेस द्वारा आयोजित रोजगार मेळाव्यात तेही चक्क व्यासपीठावर उपस्थित दिसल्याने पुन्हा एकदा मोठ्या चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान आपण उमेश घरडला निमंत्रण दिलं नसल्याचा खुलासा नाना पटोले यांनी केला आहे. तर आपण नाना पटोले यांना भेटण्यास आल्याचे उमेश गरडे याने म्हटलं आहे. दरम्यान एकाच व्यासपीठावर नाना आणि मोदी एकत्र दिसल्याने पुन्हा एकदा बहुचर्चित जुन्या प्रसंगाची आठवण झाली आहे.