मुंबई : भंडारा रुग्णालय जळीतकांड रुग्णालय प्रकरणात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. ८ जानेवारी रोजी रात्री घटनेवेळी शिशुविभागातील दोन्ही नर्स दोन्ही नर्स गैरहजर असल्याचं उघडकीस आलं आहे. या दोन्ही नर्सना नोकरीवकरून काढून टाकण्यात आलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिशुविभागात तब्बल १२ मिनिटं स्पार्क होत होता. मात्र दोन्ही नर्स गैरहजर असल्यामुळे या घटनेकडे दुर्लक्ष झालं आहे. या दोन्ही नर्सवर गुन्हा दाखल करण्याबाबत आज निर्णय घेणार असल्याचं देखील आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाणार आहे, असं देखील यावेळी राजेश टोपे यांनी सांगितलं. (भंडारा रुग्णालय जळीतप्रकरण : तब्बल २१ मिनिटं बाळं गुदमरली आणि दगावली) 


धक्कादायक बाब म्हणजे  तब्बल 21 मिनिटं बाळं धुरात तडफडत रडत होती मात्र प्रशासन सूस्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बाळं रडत होती पण त्यावेळी एकही नर्स उपस्थित नसल्याचं वास्तव समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. 


अतिशय संतापजनक आणि धक्कादायक बातमी भंडारा रूग्णालय जळीत प्रकरणासंदर्भातली आहे. भंडारा दुर्घटनेतील बाळांचा मृत्यू केवळ आणि केवळ प्रशासनाच्याच बेपर्वाईमुळे झाल्याचं उघड झालं आहे. तब्बल 21 मिनिटं बाळं धुरात तडफडत होती. मात्र प्रशासन सूस्त पडून होतं. अखेर त्या दुर्दैवी 10 बाळांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.  शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्यावर बाळ ठेवलेल्या आयसीयूने पेट घेतला. पण नर्सिंग स्टेशनमध्ये त्यावेळी एकही नर्स उपस्थित नव्हती.


खरंतर आयसीयूमध्ये नर्स उपस्थित असणं गरजेचं होतं पण आयसीयू तसंच नर्सिंग स्टेशनवरही नर्स उपस्थित नव्हती. अखेर २१ मिनिटं धुरात गुदमरून या बाळांचा मृत्यू झाला. कलिनाच्या डायरेक्टोरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीजने सीसीटीव्ही फुटेज तपासणीतून हा धक्कादायक निष्कर्श काढला आहे.