साखरपुड्याच्या दोन दिवसाआधी जवान महिलेचा अपघात, कुटुंबियांवर शोककळा
Bhandara News: ट्रकच्या धडकेत सीआरपीएफ जवान (Female Soldier) असलेली महिला अपघातात जागीच ठार झाली आहे. ट्रकच्या चाकाखाली आल्यानं तिला मरण आलं. भंडारा (Bhandara News) येथील देव्हाडी रेल्वे उड्डाणपूलावरील ही घटना आहे.
प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा: ट्रकच्या धडकेत सीआरपीएफ जवान (Female Soldier) असलेली महिला अपघातात जागीच ठार झाली आहे. ट्रकच्या चाकाखाली आल्यानं तिला मरण आलं. भंडारा (Bhandara News) येथील देव्हाडी रेल्वे उड्डाणपूलावरील ही घटना आहे. दोन दिवसावर येऊन ठेवलेल्या साखरपुड्यासाठी खरेदी करणाऱ्यासाठी भावासोबत दुचाकीवर गेलेल्या सीआरपीएफ जवान असलेल्या महिलेचा समोरून येणाऱ्या दुचाकीने कट मारल्याने बहीण-भावाची दुचाकी रस्त्यावर कोसळली आणि त्यानंतर अचानक मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली महिलेचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे तर भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी (Devhadi) येथील रेल्वे उड्डाणपुलावर घडली आहे. किरण सुखदेव आगाशे (25) असं या मृत तरुणीचे नाव असून लोकेश सुखदेव आगाशे (21) रा. निलज खुर्द, ता. मोहाडी असं जखमीचं नाव आहे. (bhandara news a soldier woman dies in an accident while returning from her engagement shopping)
नक्की काय घडलं?
किरण ही मुंबई सीआरपीएफ कैम्पमध्ये नोकरीला होती. ती लोकेशसोबत तुमसर येथे आपल्या होणाऱ्या साखरपुड्यासाठी (engagement ceremony) बॅग खरेदी करायला आली होती. आपल्या साखरपुड्यासाठी ती खूप आनंदीत होती. खरेदी करून झाल्यावर दुचाकीवरून ते दोघं (एमएच 36 ए 6693) निलजकडे जात होते. देव्हाडी उड्डाणपुलावरून जाताना समोरून आलेल्या दुचाकीने कट मारल्याने दोघेही भाऊ बहीण रस्त्यावर पडले. दरम्यान मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकखाली किरणचे डोके चिरडले गेले आणि ती जागीच ठार झाली. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता आणि शरीराचा चेंदामेंदा झाला होता तर भाऊ लोकेश हा गंभीर जखमी असून त्यांच्या वर उपचार सुरू आहेत. किरण आगाशे ही सीआरपीएफमध्ये मुंबई येथे कार्यरत होती.
सुंदर स्वप्नांचा पार चुरा झाला
तिचा विवाह (Marriage News) ठरल्याने ती आठ दिवसांपूर्वी गावी आली होती. दोन दिवसांनंतर तिचा साखरपुडा होता. या साखरपुड्यासाठी ती भावासोबत आनंदानं बॅग खरेदी करण्यासाठी गेली होती. किरण आणि लोकेश तुमसर येथे गेले होते. कापड खरेदी करून परत जाताना नियतीने घाला घातला आणि किरण अपघातात ठार झाली. या अपघाताची माहिती होताच आई व वडिलांनी एकच हंबरडा फोडला. घरात साखरपुड्यासाठी असलेले आनंदाचे आणि सुखी-समाधानाचे वातावरण एका क्षणात दुःखात आणि शोकात (family mourns) बुडाले आहे. या घटनेनं सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या वाहतुक आणि वाहतुकीची सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.