भंडारा : उपविभागीय अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी आरोपीसोबत मटण पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ स्थानिक आमदारांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक आमदाराने केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पवनी पोलिसांचा आरोपी सोबतच  मटण पार्टी करतांना एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी हा व्हिडिओ प्रसारमाध्यमांना देत पोलीस आणि वाळू माफियांचे संबंध उघड केले आहेत. 


विशेष म्हणजे पार्टी करताना त्या पोलीस कर्मचाऱ्यांचं संभाषणात मोठा धक्कादायक खूलासा झाला आहे. हा किरकोळ विषय आहे तुमसर पोलीस स्टेशनला असताना अनेक आरोपींची नावे उडविली असं एक पोलीस कर्मचारी बोलत आहे. या व्हिडिओत आयजी यांचाही उल्लेख पोलीस कर्मचाऱ्यांनी केला आहे. 


या व्हिडिओने भंडारा पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. 


<



घटना काय होती
काल पहाटे 3:30 मिनिटांच्या दरम्यान भंडारा उपविभागीय अधिकारी यांच्या कारवर 20 ते 25 वाळू माफियांना हल्ला चढवत कारच्या काचा फोडल्या तसंच उपविभागीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांनी पवनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला तसंच आरोपींच्या शोधात पथक रवाना केलं. 


पोलिसांनी आरोपींचा शोध लावला खरा पण त्यांना अटक करण्याऐवजी त्यांच्यासोबत एका हॉटेल मध्ये मटण पार्टी केली.