माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा : भंडाऱ्यात एका वाघानं थेट लग्नमंडप गाठला अन् एकच खळबळ उडाली.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाघाच्या शोधासाठी वनविभागाकडून गस्त घालण्यात येतेय. मात्र, तरी सुद्धा ग्रामस्थांमध्ये चांगलीच दहशत आहे.


भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातल्या धामनेवाडा परिसरात भर लग्नात वाघानं एन्ट्री घेऊन दहशत निर्माण केली होती. सुंदरटोलामधली एक महिलाही या वाघाच्या हल्ल्यात जखमी झाली होती. या घटनांनंतर वनविभाग चांगलाच सतर्क झालाय.


सद्यपरिस्थितीत या वाघानं वन परिक्षेत्रात प्रवेश केल्यामुळे वन्यजीव प्रेमींनी सुटकेचा श्वास सोडलाय.


सध्या हा वाघ या भागात आढळून आला नसला तरी गावकऱ्यांमध्ये दहशत कायम आहे. वन विभाग तसंच वन्यजीव प्रेमी सीमावर्ती भागात या अनोळखी पाहूण्याच्या हालचालीवर नजर ठेवून आहे.



भंडारा | भर दिवसा लग्न मंडपात वाघ आला अन्...