प्रवीण तांडेकर, भंडारा : राज्यात कुणीही गरीब भुकेला राहू नये यासाठी रेशनिंग धान्यांची व्यवस्था सरकारने केली. पण भंडाऱ्यांसह (Bhandara) काही जिल्ह्यात गोरगोरीब जनतेला ( Villagers ) किड लागलेले धान्य (Full Of Worms) खाऊ घालण्याचे काम प्रशासन आणि काही रेशन दुकानदार (Ration shopkeeper) करत आहेत, असेच चित्र दिसून येत आहे. त्यामुळं शासन-प्रशासन रेशनच्या नावावर दुकानदारांची थट्टा करतंय, का असा सवाल उपस्थित होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडारा जिल्ह्यात रेशनिंगवरील हा मका जनावरंही खातील की नाही याबाबत शंका आहे. किड लागलेला हा मका गोरगरीब रेशनिंगधारकांच्या माथी मारला जातोय. मुळात आता मका कोणीही खात नाही. तो जनावरांना दिला जातो. तरीही पुरवठा विभागाकाडून निकृष्ट मका रेशनिंगधारकांच्या माथी का मारला जातो असा सवाल विचारला जात आहे.



खराब मका असेल तो बदलून देऊ असं पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. तालुका पुरवठा निरीक्षक सत्यवान बांते यांनी तशी माहिती दिली आहे. रेशनिंगधारकांच्या माथी नेहमीच निकृष्ट धान्य मारलं जातं. आता किड लागलेला मका देऊन सरकारनं गोरगरिबांची चेष्टा चालवलीय का असा प्रश्न रेशनिंगधारकांनी उपस्थित केला आहे.