पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील लसीकरण, म्युकरमायकोसीस  आजार, तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न आदींबाबात भाष्य केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील कोरोना परिस्थिती आढावा बैठक घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज उपस्थित होते. अधिकारी आणि लोकप्रतिनिधिंशी चर्चा करून त्यांनी पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला त्यानंतर, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


1) राज्यात संभावित कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत नियोजन सुरू आहे. सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा आणि औषधांची कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न करणार आहे. तिसऱ्या टप्प्यात लहान मुलांना लागण होण्याची शक्यता
त्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात येणार आहे. ऑक्सिजनसाठी 3000 मेट्रिक टनचे लक्ष्य आहे. सध्या राज्यात 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. 


2)  लसीचा पुरवठा कमी होतोय म्हणून 18 ते 44 वयोगतील लसीकरण तात्पुरते थांबवलं आहे. पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस देण्याला राज्य सरकारचे प्राधान्य आहे. 


3) भारत बायोटेकने पुणे जिल्ह्यात 28 एकर जमीन मागितली आहे. ती तातडीने देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या लसीचे उत्पादन सुरू व्हायला 3 महिने लागतील. परंतु त्याधी त्यांना आवश्यक गोष्टी उपलब्ध होतील. याची आपण काळजी घेत आहोत.


4) म्युकोरमायकोसीसवरील औषधांचा काळा बाजार होणार नाही, याची खबरदारी राज्य सरकार घेईल. पुरेशा प्रमाणावर औषध उपलब्ध करून असतील.  महात्मा फुले जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसीसचा उपचार होईल. तज्ज्ञांच्या मते म्युकरमायकोसीस हा संसर्गजन्य रोग नाही.


5) रुग्णालयातील किमान 10 बेड्स लहान मुलांसाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. लहान मुलांमधील धोका ओळखून टास्क फोर्स स्थापन करणार आहोत.