कोल्हापूरच्या अपघातात केदारी कुटुंब उद्ध्वस्त
कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर घडलेल्या अपघातानं पुण्याच्या बालेवाडी गावठाणात राहणाऱ्या केदारी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
पुणे : कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर घडलेल्या अपघातानं पुण्याच्या बालेवाडी गावठाणात राहणाऱ्या केदारी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
बालेवाडीमध्ये राहणाऱ्या भरत केदारी यांच्या धाकट्या मुलासह, दोन सुना, एक मुलगी आणि नातवंडांवर काळाने घाला घातला.
गणपतीपुळे येथून देवदर्शन करून परतत असताना कोल्हापूरमध्ये मिनी बस कोसळून झालेल्या अपघातात भरत यांचा धाकटा मुलगा सचिन केदारी त्याची पत्नी नीलम केदारी आणि त्यांची मुले संस्कृती आणि सानिध्य यांचा करुण अंत झालाय.
अधिक वाचा : पंचगंगा नदीत बस कोसळली १२ ठार, ३ जखमी
केदारी यांची थोरली सून भावना केदारी त्यांची मुले साहिल आणि श्रावणी यांना ही या अपघातात प्राण गमवावे लागलेत.
एवढंच नाही तर भरत केदारी यांची मुलगी छाया नांगरे आणि त्यांचा मुलगा प्रतिक नांगरे यांनाही या अपघातात प्राण गमवावे लागलेत. मुलगी प्राजक्ता ही अपघातात जखमी झालीय.
अधिक वाचा : कोल्हापूर अपघात : 'मदत वेळीच पोहचली असती तर...'
भरत केदारी यांची दुसरी मुलगी मनीषा वरखडे सुदैवाने या अपघातात बचावल्या. मात्र पती संतोष वरखडे आणि मुलगी ज्ञानेश्वरी आणि गौरी यांना ही प्राण गमवावे लागले.
भरत यांच्या पत्नी मंदा केदारी याही जखमी आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य गेल्याने संपूर्ण बालेवाडीवर शोककळा पासरलीय.