Bhaskar Jadhav Video : भास्कर जाधवांनी केली एकनाथ शिंदेंची नक्कल, मिमिक्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल!
Bhaskar Jadhav mimicked Eknath Shinde : भास्कर जाधवांनी केलेल्या मिमिक्रीचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
Bhaskar Jadhav : केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरतं शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह (shivsena symbol) गोठवलं. तसेच शिवसेना नावावर देखीलं बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता नवीन चिन्हाबाबत ठाकरे आणि शिंदे गटात चिंतन सुरू आहे. दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगल्याचं दिसतं असताना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मिमिक्री केल्याचं पहायला मिळालं. (Bhaskar Jadhav mimicked Eknath Shinde the video of the mimicry went viral)
महाप्रबोधन यात्रेवेळी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दसरा मेळाव्यातील भाषणावरून जोरदार निशाणा साधला. भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करत टोला लगावला आहे. त्यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांना देखील निशाण्यावर घेतलं. त्यांच्या हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
देवेंद्र फडणवीसांनी लिहून दिलंय, संपूर्ण भाषण वाचल्याशिवाय मान वर काढली तर याद राखा, असं म्हणत भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. त्यावेळी भास्कर जाधव यांनी मान वळवून एकनाथ शिंदेंची मिमिक्री देखील केली. ठाण्यातील उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेवेळी बोलताना भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
पाहा भास्कर जाधव यांचा संपूर्ण व्हिडीओ -
(17.20 मिनिटावर पाहा मिमिक्रीचा व्हिडीओ)
दरम्यान, महाराष्ट्रातल्या मराठी गद्दारांनी शिवसेना बुडवली असून त्यांना हे पाप फेडावं लागणार, अशी घणाघाती टीका जाधवांनी शिंदे गटावर केली. तसेच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत जरी हे षडयंत्र आखलं गेलं असलं तरी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पोट निवडणूक लढणार आणि जिंकूनही दाखवणार, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला होता.
आणखी वाचा- संजय राऊत यांना दिलासा नाहीच; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली