१ जानेवारीला दंगलीवेळी मी सांगलीत- संभाजी भिडे
`१ जानेवारी रोजी प्रत्यक्षात मी सांगलीला मुक्कामी असतानाही माझ्यावर हा आरोप ठेवण्यात आला.`
मुंबई : १ जानेवारीला भिमाकोरेगावला घटलेल्या दगडफेकीच्या घटनेचा राज्यभरातून निषेध करण्यात आला. राज्यभरात याचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले.
यावेळी भिडे गुरूजी यांच्यावर १ जानेवारीच्या घटनेचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान संभादी भिडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'मी सांगलीत'
याप्रकरणी शिवप्रतिष्ठानतर्फे निवेदन जारी करण्यात आले आहे. १ जानेवारी रोजी प्रत्यक्षात मी सांगलीला मुक्कामी असतानाही माझ्यावर हा आरोप ठेवण्यात आला.
आम्ही संपूर्ण हिंदुस्थान एकत्र करण्याच्या मार्गावर असताना असे आरोप करणे निराधार आहेत असे त्यांनी सांगितले.
चौकशीची मागणी
भीमा-कोरेगाव प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी संभाजी भिडे यांनी निवेदनातून केली आहे.