देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : लॉकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्रातील उद्योगधंद्यातल्या लोकांना बसला असून असंघटित क्षेत्रातील कामगार यांचे उपासमारीने भयंकर हाल होत आहेत. त्याच बरोबर नाटक, सिनेमा, तमाशा, वाद्यवृंद, कव्वाली, शाहिरी कला पथक या क्षेत्रातील कलाकार ही उपासमारीचीचा सामना करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दोन महिन्याचे कार्यक्रम रद्द झाल्याने लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या भीमशाहीर निवृती आढाव यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठवड्यातील  बहुतेक लोक पुणे परिसरात कामाला जातात. यात आंबेडकरी जलसा आणि कव्वाली करणारे गायक, वादक, कलावंत मोठ्या संख्येने आहेत. सध्या हे कलाकार पुणे शहरात रोजगारासाठी आले. मात्र, लॉकडाऊनमुळे हे सर्व कलावंत आणि भीमशाहीर पुण्यात अडकले आहेत. त्यांना भीम जयंतीचे सर्वाधिक कार्यक्रम असतात. पण आता दोन महिने कार्यक्रम नसल्यामुळे जालना रामनगर येथून पुण्यात बिगारी काम करण्यासाठी आलेले भीमशाहीर निवृती आढाव आणि इतर कलावंत पुण्यात अडकले असून कसलंच काम मिळत नसल्याने आढाव आणि इतर कलावंत यांना रोजचा दिवस ढकलणं अतिशय अवघड झालं आहे. 


या सर्व कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुण्यातील वार्जे माळवाडी, गोकुळनगर लगतच्या पत्राशेडमध्ये आपल्या कुटुंबासह राहत असलेले आढव आणि इतर कलाकार यांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महारष्ट्रात आणि देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दोन महिन्यांपासून असते. जून महिना अखेर पर्यंत जयंती साजरी होत असते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व्यासवसिक गायक, कलाकार, वाद्यवृंद, आंबेडकरी शाहिरी जलसाकार, कव्वाली या कलावंतांना दोन अडीच महिने अनेक कार्यक्रम असतात. 


मात्र  लॉकडाऊन आणि आणीबाणी असल्याने या सर्व कलाकारांचे काम गेले आहे. तर मराठवावड्यातील काही कलावंत मार्चपर्यंत अनेक राज्यात अनेक भागात मजुरीसाठी गेलेले पुन्हा आपल्या गावी जाणार होते. मात्र लॉकडाऊन सुरु झाल्याने हे कलावंत पुन्हा आपल्या मूळ गावी जाऊ शकले नाही. तसंच पुण्यात त्यांची ओळख नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.