नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव हिंसाचारातील आरोपींची सुटका करण्याची मागणी गैर सरकारी संघटना एमनेस्टी इंटरनॅशनलने केली आहे. हे आरोपी हिरो असल्याचे या संघटनेने म्हटले आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांवर हल्ला करणे हे देशहितार्थ नसल्याचे सांगत या आरोपींच्या सुटकेची मागणी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. संपूर्ण जग या घटनेकडे पाहतोय त्यामुळे पंतप्रधान मोदींनी या घटनेत हस्तक्षेप करण्याची गरजही या संघटनेने व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी भीमा-कोरेगाव संघटनेतील आरोपींची सुटका करावी अशी मागणी एमनेस्टी इंटरनॅशनलने केली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांवर खोटे आरोप लावले जात आहेत. अटक केलेल्या कार्यकर्त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. नऊ कार्यकर्त्यांची अटक म्हणजे देशातील मानवाधिकार दाबण्याचा प्रयत्न असल्याचे एमनेस्टी इंटरनॅशनलने केली आहे. 



भीमा-कोरेगाव प्रकरणात नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती. या निर्दोष कार्यकर्त्यांना मुक्त करण्याची मागणी एमनेस्टी इंटरनॅशनल करत आहे. यावर महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. एमनेस्टी इंटरनॅशनल या आरोपींना हिरो ठरवत असेल तर हे खूप गंभीर आहे. सरकार याकडे लक्ष देईल. मला याबद्दल माहीती नाही. यामध्ये गृह खाते लक्ष घालेल असे त्यांनी म्हटले.