Mahashivratri 2023​: 8 मार्च रोजी महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रात 12 ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंगे आहेत. परळी वैजनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ, घृष्णेश्वर अशी पाच ज्योतिर्लिंगे असून याचे हिंदु पुराणात त्यांचे महत्त्व अधिक आहे. पण तुम्हाला माहितीये का याच ज्योतिर्लिंगापैकी एकाला महाराष्ट्राचे कैलास असे म्हणतात. तर, इथेच एका नदीचा उगम होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 भीमाशंकर हे भाविकांबरोबरच ट्रेकर्स व फिरस्तीसाठीही खूप मस्त ठिकाण आहे. या तीर्थक्षेत्राची उंची आहे समुद्रसपाटीपासून एक हजार मीटर. भीमाशंकरला गुप्त भीमाशंकर, नागफणी आणि ज्योतिर्लिंग ही प्रमुख आकर्षणं आहेत. या ठिकाणावर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. खोल दऱ्या, अंगाला झोंबणारा वारा, दाट झाडी, पठार, कड्यावरुन पडणारे धबधबे हे सारे वातावरण मंत्रमुग्ध करुन टाकणारे आहे. राज्याचा राज्य प्राणी शेकरू हा देखील याच जंगलात आढळतो. भीमाशंकरचे एक मुख्य आकर्षण म्हणजे गुप्त भीमाशंकर याची आज आख्यायिका जाणून घेऊया. 


गुप्त भीमाशंकर


भीमाशंकर तीर्थक्षेत्र हे आता प्रमुख पर्यटनस्थळ बनले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात हे तीर्थक्षेत्र आहे. भीमाशंकर मंदिरापासून जवळपास 1.5 ते 2 किमीवर घनदाट जंगलात गुप्त भीमाशंकर हे स्थान आहे. जंगलाच्या पायवाटेने या ठिकाणी जाता येते. भीमानदीचा मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे. परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. हे ठिकाण गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखले जाते. 


गुप्त भीमाशंकर येथे पंचशिवलिंग आहे आणि भीमानदीच्या पाण्याने त्याच्यावर कायम अभिषेक होत असतो. पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळं पाण्याच्या प्रवाहामळे पंचशिवलिंगाचे हळू हळू झीज होऊन सध्या ३ ते ४ शिवलिंग दिसते आहे, असं म्हटलं जातं. 


भीमाशंकर मंदिराची आख्यायिका


भगवान शंकर त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध करुन एका शिखरावर विश्रांतीसाठी आले असतान युद्ध करुन थकलेल्या महादेव घामाच्या धारांनी भिजले होते. तेव्हा त्यांच्या घामाच्या धारांनी भीमा नदीची उत्पत्ती झाली, अशी एक अख्यायिका आहे


भीमा नदी


पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी आहे. चंद्रभागा ही नदी मुळची भीमा नदी आहे. येथी ती भीमा नावानेच उगम पावते आणि पुढे पंढरपुरात चंद्रभागा म्हणून ओळखली जाते.


साक्षी विनायक मंदिर


साक्षी विनायक मंदिर ही ती जागा आहे जिथे गणपतीने महादेवाला त्या राक्षसाचा वध करताना पहिले होते आणि सभा मंडळात सगळ्या देवतांसमोर साक्ष दिली होती. म्हणून मंदिराचे साक्षी विनायक असे नाव आहे.