भिवंडी : भिवंडीमध्ये रसायनाच्या गोदामाला लागलेली भीषण आग नियंत्रणात आली असून कुलिंगचं काम सुरू करण्यात आलंय. आगीमध्ये आत्तापर्यंत तरी कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही. रात्री अडीच वाजल्याच्या सुमारास भिवंडीतल्या दापोडा गावात अंजुर फाट्याजवळ प्रेरणा केमिकल्स गोडाऊनला आग लागली होती. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास आग नियंत्रणात आली. भीषण आगीत ६ ते ७ गोदामं जळून खाक झाल्याची माहिती हाती येतेय.