भिवंडीत महापौरांकडून काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण
भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरांनी काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण आहे.
ठाणे : भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरांनी काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण आहे.
रस्ता दुरुस्तीची विचारणा केली असता..
सलाम शेख रस्ता दुरूस्तीकरिता महापालिकेत विचारणा करण्यास गेला होता. त्यानंतर महापालिकेतून बाहेर निघताना गेटजवळ महापौर जावेद दळवी यांनी सलाम शेखला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाणीत सलाम शेख याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्यात.
महापौर दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी सलाम शेखला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून महापौर जावेद दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.