पैशांचा पावसाचं आमिष दाखवून भोळ्या भाबड्या लोकांची लूट करणारा भोदूबाबा
पैशांचा पाऊस पाडतो असं सांगून त्यानं आजवर अनेकांची फसवणूक केली.
हर्षद पाटील, पालघर : शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत...पण बनवा बनवीच्या गोरखधंद्यामुळे त्याचं चांगलंच फावलं. पैशांचा पाऊस पाडतो असं सांगून त्यानं आजवर अनेकांची फसवणूक केलीय...पालघर पोलिस या भोंदू बाबांच्या मागावर आहेत. कोण आहे हा भोंदू बाबा?
या भोदूबाबाचं नाव आहे रमेश राथड. पालघरच्या या बाबानं आजवर अनेकांची फसवणूक केलीय. हा बाबा लोकांना झटपट श्रीमंत करण्याचं आमिष दाखवातो. पैशांचा पाऊस पाडतो असं सांगून अडल्या नडलेल्याला आपल्या जाळ्यात ओढतो. विधीसाठी त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. मग पैशांचा पाऊस पाडण्यावेळी त्याची टोळी सक्रिय होती.
अचानक पोलिसांची धाड पडली असं भासवून हा बाबा ग्राहकाला पळून जाण्यास भाग पाडतो. मग उरलेलं काम त्याची टोळी चोख पार पाडते...या बाबाची काळी कृत्य समोर आल्यानंतर त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. आता पोलिस या भोंदू बाबाचा शोध घेताये आहेत
रमेश राथड या भोंदू बाबानं आजवर अनेकांची फसवणूक केलीय. पैशांचा पाऊस पडेल या आशेनं कित्येकांनी बाबावर पैशांची उधळण केली आहे. पण हा चलाख, संधीसाधू बाबा लोकांना हातोहात गंडवतो आहे. खरं तर पुरोगामी महाराष्ट्रात सुशिक्षित लोकही अशा भुलथापांना फसतात ही बाब मनाल पटण्याजोगी नाही. त्यामुळे तुम्ही अशा फसव्या आमिषाला बळी पडू नका. सतर्क राहा.
कुणी पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत असेल तर पोलिसांना लगेच माहिती द्या. जेणेकरून या भोंदूंचं पितळ जगासमोर उघडं पडेल.