प्रशांत शर्मा, झी 24 तास अहमदनगर : अहमदनगरमधल्या श्रीरामपूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. या बिबट्यामुळे परिसरात मोठी दहशत होती. श्रीरामपूरमध्ये नागरी वस्तीत घुसलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आलं. या बिबट्याने वस्तीतील नागरिकांना पळताभुई थोडी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीरामपूर शहरातील मोहटा देवी रोड परिसरात सकाळी बिबट्या घुसल्यानं गोंधळ उडाला होता. बिबट्यानं 3 जणांवर हल्ला केला. यावेळी झालेल्या पळापळीत 7 जण जखमी झाले. संगमनेरहून वन विभागाची रॅपिड ऍक्शन टिम घटनास्थळी आली. 


एका घराच्या बाथरुममध्ये लपलेल्या बिबट्याला, तीन तासांच्या प्रयत्नांनंतर बेशुध्द करून जेरबंद करण्यात आलं. श्रीरामपुर शहरातील वार्ड नंबर सातच्या मोहटा देवी रोड परीसरात आज सकाळच्या सुमारास नागरी वस्तीत  बिबट्या घुसलेल्याने मोठा गोंधळ उडाला होता.


बिबट्याने 3 नागरीकांनवर हल्ला केल्याने 7 जण जखमी झाले होते. या घटनेमध्ये तर एक जण बिबट्याच्या तोंडातून थोडक्यात बचावला आहे. 3 तासाच्या प्रयत्ना नंतर एका घराच्या बाथरुम मध्ये लपलेल्या बिबट्याला बेशुध्द करत जेरबंद करण्यात आल आहे.


श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात सदावर्ते हॉस्पिटल रोड परीसरात बिबट्या दिसून आला. बिबट्याच्या हल्ल्यात एक मुलगा जखमी  झाला आहे. त्याला साखर कामगार रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आल आहे.