नाशिक : एका बाजूला टाळ मृदुंगचा जयघोष, विठू नामाचा गजर तर दुसर्‍या बाजूला नाशिकमधून पंढरपूरला विठूरायच्या दर्शनासाठी सायकलवारी मार्गस्थ झाली. जवळपास सातशेहुन अधिक सायकलिस्ट यामध्ये सहभागी झाले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून या सायकलवारीला सुरुवात झाली असून यंदाची सायकल वारी ही अनोखी सायकल वारी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमधून आज सायकलवारीचे प्रस्थान झाले. सातशेहून अधिक सायकलपटू या वारीत सहभागी झालेत. सायकलवारीचं यंदाचं आठवं वर्ष आहे. ६ वर्षांच्या चिमुरडीपासून ६५ वर्षांच्या आजोबांचाही या वारीत सहभाग आहे. ६ दिव्यांग सायकलपटूही सहभागी आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरेही काही काळ वारीत सहभागी झालेत.  


कोण झालेय सहभागी


- नाशिकमधून सायकल वारीचे प्रस्थान 
- सातशेहुन अधिक सायकलिस्ट सहभागी
- सायकल वारीचे आठवे वर्ष 
- ६ वर्षाच्या चिमुरडीपासून ते ६५ वर्षांच्या आजोबांचा ही सहभागी
- ६ दिव्यांग ही करणार सायकल वारी
- नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरेही सायकल वारीत सहभागी