Pune Lalit Patil Drug Racket: पुण्यातील ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणी ससून रुग्णालयाचा चौकशी अहवाल सादर करण्यात आलाय. यात डॉक्टरांवर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. ससून हॉस्पिटलचे डीन डॉ.संजीव ठाकूर यांना पदमुक्त करण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय. तर  ससूनचे एचओडी डॉ.देवकाते यांना निलंबित करण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय. 


संजीव ठाकूर यांना पदावरून हटवले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ससून हॉस्पिटलचे डीन संजीव ठाकूर यांना पदावरून हटवण्यात आलंय. एका जुन्या प्रकरणाचा दाखला देत संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यात आलंय. विनायक काळे यांना पदावरून हटवत संजीव ठाकूर यांची नेमणूक  करण्यात आली होती. या नेमणुकीविरोधात विनायक ठाकूर यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. याप्रकरणी सुनावणी करताना मॅटनं संजीव ठाकूर यांना डीन पदावरून हटवलंय. ड्रग्जमाफिया ललित पाटीलला ससूनमध्ये रॉयल ट्रीटमेंट दिल्यावरून संजीव ठाकूर चर्चेत आले होते. त्यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. दरम्यान विनायक काळेंच्या तक्रारीवरून आता त्यांना डीनपदावरून हटवण्यात आलंय.


हिवाळी अधिवेशनात ललित पाटीलचा मुद्दा गाजणार


हिवाळी अधिवेशनात ललित पाटीलचा मुद्दा गाजणार अशी शक्यता दिसत आहे. आमदार रवींद्र धंगेकरांनी हिवाळी अधिवेशनात ललित पाटीलचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचा इशारा दिला आहे.ललित पाटील पळाल्याप्रकरणी गतीने तपास झाला नसल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे. सरकार आणि डीन संजीव ठाकूर ललित पाटीलला वाचवत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलणार असून प्रसंगी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याचंही धंगेकर म्हणालेत.


ललित पाटीलप्रकरणी आधीच पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह 


ललित पाटीलप्रकरणी आधीच पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच सुषमा अंधारेंनी ट्विट केलेल्या व्हिडीओने एकच खळबळ माजली. अंधारेंनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये कैद्यांना घेऊन जाणारी गाडी अज्ञात स्थळी थांबवण्यात आल्याचं दिसतंय.तर, पोलिसांसमोरच कैद्यांशी संबंधीत काही व्यक्ती कैद्यांना पाकीटं देत असल्याचं दिसतंय...पोलिसांच्या कारभाराकडे बोट दाखवत सुषमा अंधारेंनी हा व्हिडीओ पुण्यातील असल्याचा दावा केलाय.