Ajit Pawar on Sharad Pawar : पवार काका पुतण्यामधील संघर्ष पेटताना दिसत आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप केला आहे. विशेष म्हणजे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचे नाव घेत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं थेट नाव न घेता मोठा आरोप केला आहे. दाऊदसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं? भूखंडाचे श्रीखंड खाल्लं आरोप कोणावर आहे? असा सवाल विचारत अजित पवारांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.  या आरोपांमध्ये तथ्य नव्हतं मात्र आरोप झालेच ना. बदनामी झाली ना असं विधान अजित पवारांनी केले आहे. भ्रष्टाचाराचा आरोप केव्हा होईल. तुम्ही मंत्री झाला तर होईल ना... खासदार, आमदारावर कशाचा भ्रष्टाचाराचा आरोप होईल असं अजित पवार म्हणाले. बारामतीत कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. 


इंदापूरच्या सभेत अजित पवार यांचे वादग्रस्त विधान 


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इंदापूरच्या सभेत वादग्रस्त विधान केलं.लोकसभा निवडणुकीला बटण कचाकचा दाबा असं म्हणताना अजित पवारांनी तुम्हाला निधी पाहिजे तेवढा देतो असं म्हटलं. त्यामुळे एक नवीन वाद उभा राहिलाय.उपमुख्यमंत्री अजित पवारच मतदारांना आमिष दाखवत असल्याची टीका विरोधक करताय. दरम्यान अजित पवारांच्या वक्तव्यावरुन संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केलीये. ते व्यापारी आहेत त्यामुळे सौदाच करणार असा टोला राऊतांनी लगावलाय. तर, ही प्रलोभनं अचारसंहितेत येत नाहीत का असा सवाल शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय.


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी डॉक्टरांना अजब सल्ला दिलाय. आमचं नाव घेणा-या पेशंटला चांगली वागणूक द्या आणि दुसरं नाव घेतली की पेशंटला इंजेक्शन द्या,  असं विधान अजित पवारांनी केलंय. इंदापूरच्या सभेत त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय. या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवारांची माफी देखील मागितलीय.


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इंदापूरच्या एका सभेत डॉक्टरांना अजब सल्ला दिलाय. आमचं नाव घेणा-या पेशंटला चांगली वागणूक द्या आणि दुसरं नाव घेतली की पेशंटला इंजेक्शन द्या, असं विधान अजित पवारांनी केलंय. या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवारांची माफी देखील मागितलीय. मात्र या विधाननंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. नशीब, विष आणून देतो... विषाचं इंजेक्शन द्या, असं म्हटले नाहीत, अशी टीका आव्हाडांनी केली.


एकनाथ खडसे यांना  दाऊद आणि शोटा शकीलकडून जीवे मारण्याची धमकी 


एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये.. चार वेगवेगळ्या मोबाईलवरुन त्यांना धमकीचे फोन आलेत.  दाऊद आणि शोटा शकीलकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. यासंदर्भात एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. 15 आणि 16 एप्रिलला हे फोन आल्याची माहिती खडसेंनी तक्रारीत दिलीये. दरम्यान खडसे मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांना मोठ्या धमक्या येतील अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी केली.