Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांना धक्का देणारे वृत्त समोर आले आहे.  मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट झाली आहे.  2013 मधील एका  प्रकरणात मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. आता या प्रकरणात मनोज जरांगे-पाटील यांना अटक होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण?


नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणात मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.  नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे.  नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक  केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात 2013 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.   या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते.  त्यानंतर ते एकदा कोर्टात हजर झाले होते. मात्र पुढच्या तारखांना ते गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.


मनोज जरांगे पाटील 11 ऑगस्टला पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत.. यावेळी पुण्यात मराठा समाजाची भव्य रॅलीही काढण्यात येणार आहे.. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात मनोज जरांगे पाटील पुण्यात देखील सभा घेणार आहेत. आज पत्रकार परिषद घेऊन या सभेची घोषणा करण्यात येणार आहे.. या सभेसाठी सकल मराठा समाजकडून तयारीला सुरुवातही करण्यात आलीये. 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची तब्येत 22 जुलै रोजी खालावली होती. वैद्यकीय पथकाकडून त्यांची तपासणी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री पुजारे यांनी स्वतः त्यांची तपासणी केली.. अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.. मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या माध्यमातून ओबीसीमध्येच आरक्षण द्यावं, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे.