Big Breaking। राज्यातल्या बोगस शिक्षकांची यादी `झी तास`च्या हाती
Bogus Teachers in Maharashtra : राज्यातल्या शिक्षण क्षेत्राला हादरवणारी सर्वात मोठी बातमी. राज्यातल्या बोगस शिक्षकांची यादी `झी तास`च्या हाती लागली आहे.
सागर आव्हाड / पुणे : Bogus Teachers in Maharashtra : राज्यातल्या शिक्षण क्षेत्राला हादरवणारी सर्वात मोठी बातमी. राज्यातल्या बोगस शिक्षकांची यादी 'झी तास'च्या हाती लागली आहे. मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत बोगस शिक्षकांचे लोण दिसून येत आहे.
'झी 24 तास' इन्व्हेस्टिगेशनमध्ये बोगस शिक्षकांची यादी उघड झाली आहे.
राज्यातल्या 7880 बोगस शिक्षकांचा 'झी 24 तास'ने पर्दाफाश केल्यानंतर आता थेट या बोगस शिक्षकांची यादीच 'झी 24 तास'च्या हाती लागली आहे. कोणत्या जिल्ह्यात किती बोगस शिक्षक आहेत याची सर्व कागदपत्रं 'झी तास'ने मिळवली आहेत.
मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत सर्वच जिल्ह्यांमध्ये बोगस शिक्षकांचे लोण पसरल्याचे 'झी 24 तास'च्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झाले आहे. कोणत्या जिल्ह्यात नेमके किती बोगस शिक्षक सापडले आहेत ते पाहूयात.
कोणत्या जिल्ह्यात किती बोगस शिक्षक ?
मुंबई दक्षिण - 40
मुंबई पश्चिम - 63
मुंबई उत्तर - 60
रायगड - 42
ठाणे - 557
पालघर - 176
पुणे -395
अहमदनगर - 149
सोलापूर - 171
नाशिक - 1154
धुळे - 1002
जळगाव - 614
नंदुरबार - 808
कोल्हापूर - 126
सातारा - 58
सांगली - 123
रत्नागिरी - 37
सिंधुदुर्ग - 22
औरंगाबाद - 458
जालना - 114
बीड - 338
परभणी - 163
हिंगोली - 43
अमरावती - 173
बुलढाणा - 340
अकोला - 143
वाशिम - 80
यवतमाळ - 70
नागपूर - 52
भंडारा - 15
गोंदिया - 09
वर्धा - 16
चंद्रपूर - 10
गडचिरोली - 10
लातूर - 157
उस्मानाबाद - 46
नांदेड - 259