Breaking | राज्यात पेट्रोल - डिझेलचे दर कमी होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
आज कॅबिनेटच्या बैठकीत काही लोकहिताचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
मुंबई : आज कॅबिनेटच्या बैठकीत काही लोकहिताचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत राज्यातील पेट्रोल - डिझेलच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रति लीटर कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा भार पडणार आहे. पेट्रोल - डिझेलचे दर कमी केल्याने राज्यातील मालवाहतूकीचा खर्च कमी होऊन महागाई काही प्रमाणात कमी होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
केंद्र सरकारच्या अमृत योजनेचा राज्यात दुसरा टप्पा सुरू करण्यात येईल. जलसाठ्यांचे पुनर्जिवन करण्याचा निर्णयदेखील या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 400 निमशहरी भागाचा सामावेश आहेत. या शहरांमध्ये स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन देण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगर परिषदेती नगराध्यक्ष, ग्रामपंचातीतील सरपंच थेट लोकांमधून निवडण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात येणार आहे. तसेच बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.
आणिबाणीच्या काळात ज्या लोकांना तुरूंगात राहावं लागलं त्यांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना 3600 लोकशाही स्वातंत्र्यसेनानी आहेत, ज्यांना पेन्शन मिळणार आहे.