औरंगाबाद : औरंगाबादमधल्या रस्ते कामातला मोठा गैरव्यवहार गंगापूरचे भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी उघड केला आहे. याबाबतची त्यांची एक व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यात प्रशांत बंब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यासोबत बोलताना दिसत आहेत. २००९ ते २०१४ या दरम्यान औरंगाबाद आणि परिसरात १ हजार ५९४ छोट्या रस्त्यांची कामे झाली. ही सगळी कामे सदोष असल्याचा बंब यांचा आरोप आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत त्यांनी तक्रार केल्यानंतर ६९ कामांची चौकशी झाली. आणि चौकशी अहवालातही कामांतला गैरव्यवहार स्पष्ट झाला. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित कंत्राटदारांना बिलं अदा करु नये असे आदेश दिले होते. तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना ६० कोटींची बिलं संगनमताने अदा केल्याचा बंब यांचा आरोप आहे. 


या गैरव्यवहारा प्रकरणी झी २४ तासने काही प्रश्न उपस्थित केले आहेत, गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट असतानाही देषी अधिकाऱ्यांवर अजून कारवाई का नाही? आमदारांच्या हस्तक्षेपापर्यंत सरकारच्या लक्षात हा गैरव्यवहार का आला नाही? सरकारची फसवणूक करणाऱ्यांवर काय कारवाई होणार? कंत्राटदारांना देण्यात आलेले ६० कोटी रूपये सरकार कसे वसूल करणार? मंत्र्याच्या नकारानंतरही अधिकारी पैसे देतात ही घटनाच मुळात गंभीर आहे.