रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक राजेवाडी येथे सांडपाणी वाहून नेण्यासाठी आणलेल्या पाईपला लागलेली आग विझवण्यात आलीय. यामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी नवीन प्रकारचे पाईप आणण्यात आले होते आणि त्याच पाईप्सनी पेट घेतला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसलं तरी जवळच्या गवताने पेट घेतला असावा आणि त्याची झळ या पाईपना लागली असावी असा अंदाज आहे.



मुंबईतही आगीची घटना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुलुंडच्या भक्तिमार्ग परिसरामध्ये महानगर गॅस पाईपलाईन फोटो एलपीजी गॅस ची गळती झाल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती. दुपारी बाराच्या सुमारास पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याच्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम सुरू होते त्याचवेळी एका कर्मचाऱ्याकडून पाईपलाईनचे काम करताना महानगर गॅसच्या पाईप कापला गेला त्याच वेळी दुसरा कर्मचारी त्याठिकाणी वेल्डिंग काम करत होता वेल्डिंग करताना निघालेल्या ठिणग्या या एलपीजी गॅसच्या संपर्कात आल्या आणि आगीचा मोठा भडका उडाला ज्यामध्ये कुठलीही जीवित हानी जरी झाली नसली तरी रस्त्याच्या कडेला असलेले झाड या आगीच्या विळख्यात आले आणि जळाले.


या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गॅस पुरवठा खंडित करून ही आग तासाभरात आटोक्यात आणली . दरम्यान सध्या शहरात विविध विकासकामांच्या निमित्ताने रस्ते खणले जातात परंतु गॅसच्या पाइपलाइन या रस्त्यावरून गेल्या असल्यामुळे पालिकेकडून खोदकाम करण्यापूर्वी खबरदारी घेण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.