Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर शिवसेना ठाकरे गटाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. ठाकरे गट स्वबळावर विधानसभा निवडणुक लढण्याची शक्यता आहे.  288 जागांवर ठाकरे गट आपले उमेदवार उभे करणार असल्याची देखील चर्चा आहे. ठाकरे गटाकडून तशा प्रकारच्या हालचाली सुरु आहेत. ठाकरे गटाने बैठकांचा जोर वाढवला आहे. ठाकरे गटाने स्वबळवार विधानसभा निवडणुक लढवल्यास याचा मोठा फटका महाविकासआघाडीला बसू शकतो. यामुळे राज्यातील सर्व राजकीय समीकरणं बदलू शकतात अशी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी


ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. शिवसेना भवनात राज्यभरातील 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी 288 जागांच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभेनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभानिहाय उमेदवारांसाठी चाचपणी सुरू केली आहे. लोकसभेच्या निकालावरून मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढवली तर काय होईल यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी अहवाल मागवला आहे.


काय आहे ठाकरे गटाची रणनिती


लोकसभेनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभानिहाय उमेदवारांसाठी चाचपणी सुरू केली आहे.  लोकसभेच्या निकालावरून आपण मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढली तर काय होईल याचा अहवाल ठाकरे गटाने मागितला आहे.  विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला अनुकूल आहे का? असल्यास उमेदवार कोण असावा? तसंच संभाव्य विजयाचे समीकरण कसं असेल याबाबतही ठाकरेंनी अहवाल मागितला आहे.  त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये स्वतःच्या उमेदवाराचे तसंच मित्रपक्षाच्या उमेदवाराचे पदाधिकारी यांनी काम केलं की नाही याबाबतचा देखील अहवाल मागितला आहे.  


ठाकरे गट कसा बनवणार विधानसभा संपर्कप्रमुख अहवाल?


  1. लोकसभा निवडणूक २०२४ चे विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल

  2. यादीप्रमाणे पूर्ण बुथप्रमुख होते का? न होण्याची कारणे, असल्यास कार्यरत होते का?

  3. शिवसेना उमेदवाराचे काम महाविकास आघाडीमधील मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले का?

  4. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले का?

  5. सदर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेस अनुकूल आहे का? असल्यास संभाव्य उमेदवार कोण असावा?

  6. संभाव्य विजयाचे समिकरण कसे असेल?

  7. फक्त शिवसेना लढली तर काय होईल?

  8. मतदारसंघ शिवसेनेस अनुकुल नसल्यास, आघाडीत कोणत्या पक्षास द्यावा, उमेदवार कोण असू शकतो?

  9. बीएलए एजंटचे निवडणूक कार्यालयात रजिस्ट्रेशन झाले आहे का? निवडणूक आयोगाची ओळखपत्रे आपल्याकडे आहेत का? नसल्यास त्वरित करुन घ्यावे.

  10. लोकसभा निवडणूक २०२४ आपला अभिप्राय थोडक्यात ?