बस आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, 20 ते 25 जण जखमी
सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाल्याचं वृत्त आलेलं नाही. पण 20 ते 25 जण जखमी झाले आहेत.
परभणी : मोठी बातमी समोर आली आहे. बस आणि ट्रॅव्हल्सचा हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात जवळपास मात्र 20 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचं समजतंय.
दोन्ही वाहनं समोरासमोर धडकल्याने मोठा अपघात झालाय. सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झाल्याचं वृत्त आलेलं नाही. पण 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. या जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मराठवाड्यातील परभणीतील ही घटना आहे. (big news 20 to 25 injured in bus and travel accident at karam pati in parbhani)
माऊली ट्रॅव्हल्स ही गंगाखेड वरून पुणे येथे जात होती. तर परिवहन महामंडळची बस गंगाखेड कडे येत होती. या दरम्यान गंगाखेड परभणी रोडवरील करम पाटी परिसरात समोरा ही दोन वाहनांची धडक बसली आहे. अपघातात जखमी झालेल्यांना गंगाखेड आणि परळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहे.
गोंदियात मोठा अपघात
गोंदिया जिल्हाच्या सडक अर्जुनी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या खोबा गावाजवळ झालेल्या अपघातात 4 तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. हे चारही तरुण गोंदिया जिल्याच्या आमगाव तालुक्यातील आहेत. आमगाव तालुक्यातील पाच तरुण नवेगावबांध येथे सोलर पंप फिटींग करण्यासाठी एका 4 चाकी वाहनाने गेले होते.
सोलर फिटींगची कामं पूर्ण करुन हे 5 तरुण रात्री परतत होते. याचवेळेस अचानक गाडी अनियंत्रित झाली. त्यामुळे गाडी रस्त्याच्या खाली आपटुन चकनाचूर झाली. यात 5 पैकी 4 तरुणांचा घटना स्थळी मृत्यू झाला. प्रदीप बिसेन हा 24 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यावर गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.